मुंबई

उल्हासनगर महानगरपालिकेच्या ‘महसूल’वर सभापतींचा वॉच

CD

उल्हासनगर, ता. ७ (बातमीदार) : महसूल समिती सभापती प्रेरणा अजित माखीजानी यांच्या उल्हासनगर महापालिकेतील कार्यालयाचे उद्घा‌टन युथ आयकॉन ओमी कलानी, महापौर अश्विनी कमलेश निकम, माजी महापौर पंचम कलानी, नगरसेविका सीमा कलानी यांच्या हस्ते झाले आहे. याप्रसंगी मालमत्ता कर विभागातील महसूलवर वॉच ठेवण्यात येणार असून, ऑनलाइन टॅक्स भरल्यास नागरिकांना अर्धा टक्के सवलत देण्यात येणार असल्याची माहिती सभापती प्रेरणा माखीजानी, त्यांचे पती अजित माखीजानी यांनी दिली.

या कार्यक्रमाला शिवसेना गटनेते अरुण आशान, स्थायी समिती सभापती कलवंतसिंग(बिट्टू) सोहता, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, कमलेश निकम, महिला बालकल्याण समिती सभापती मीना सोंडे, सार्वजनिक आरोग्य समिती सभापती सविता तोरणे रगडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
आपल्या बेधडक शैलीसाठी ओळखले जाणारे अजित माखीजानी यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे जनतेच्या पैशांच्या वापराबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित केला असून, त्यावर वॉच ठेवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता त्यांच्या या वक्तव्यांनंतर शहराच्या राजकारणात कोणते नवे वळण येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उल्हासनगर : येथे महापालिकेतील कार्यालयाचे उद्घा‌टन ओमी कलानी, अश्विनी निकम, पंचम कलानी, सीमा कलानी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होती २३ वर्षीय नंदिनी? घरात आढळला मृतदेह, आपच्या तिकिटावर लढलेली निवडणूक

अखेर 'मुरांबा' निरोप घेणार; शशांक केतकरने शेअर केले फोटो, सांगितलं कसा होणार मालिकेचा शेवट

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या-बलात्कार प्रकरण! न्यायालयीन सुनावणीनंतर पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकिलांची संयुक्त पत्रकार परिषद

Ayodhya Ram Temple Threat : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय दहशतवादी सुहैलची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली, 'मेनन अँड जित्तू -333' काय आहे?

Hasan Mushrif Gokul Milk : गोकुळ दूध संघात हसन मुश्रीफांनी ताकद दाखवली, २ हजार ठराव केले दाखल; सगळ्यांना पर्यटनासाठी नेणार, हॉटेल पॉलिटिक्स सुरू

SCROLL FOR NEXT