मुंबई

महापालिका शाळांच्या गणवेश ठेक्यावर वाद

CD

महापालिका शाळांच्या गणवेश ठेक्यावर वाद
महिला बचत गटांना प्राधान्य देण्याची मागणी; ३० कोटींच्या टेंडरवर चर्चा
नेरूळ, ता. ७ (बातमीदार) : महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश पुरवठ्याच्या ३० कोटी रुपयांच्या टेंडरवरून सभागृहात चर्चा रंगली असून, हा ठेका बाहेरील कंत्राटदारांना देण्याऐवजी महिला बचत गटांना द्यावा, अशी ठाम मागणी नगरसेवक अभिजित देसाई यांनी केली. महिला सक्षमीकरणाचा अर्थ केवळ आर्थिक मदत नसून त्यांना स्वावलंबी बनवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महासभेत या टेंडरवर चर्चा होत असताना काही नागरिकांकडून विरोध दर्शविण्यात आला होता. या वेळी देसाई यांनी स्थानिक महिला बचत गटांना प्राधान्य दिल्यास सुमारे तीन हजार महिलांना रोजगार मिळू शकतो, असे सांगितले. यामुळे शहरातील आर्थिक व्यवहारांना चालना मिळून निधी स्थानिक स्तरावरच फिरता राहील, असेही त्यांनी नमूद केले.
महिला बचत गटांकडे शिवणकाम आणि उत्पादनाची क्षमता असून, आवश्यक असल्यास महापालिकेने प्रशिक्षण, गुणवत्ता नियंत्रण आणि पुरवठा व्यवस्थापनासाठी मदत करावी, अशीही त्यांनी सूचना केली.
देसाई म्हणाले की, बाहेरील कंत्राटदारांना ठेका दिल्यास रोजगाराच्या संधी शहराबाहेर जातील. मात्र, महिला गटांना संधी दिल्यास स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि महिलांमध्ये उद्योजकतेची भावना विकसित होईल.

चौकट
महिला सक्षमीकरण
महिला बचत गटांना गणवेश पुरवठ्याचा ठेका देणे हा केवळ एक व्यवहार नसून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा मार्ग ठरू शकतो. यामुळे महिलांना नियमित उत्पन्न, कौशल्यविकास आणि आत्मविश्वास मिळेल. तसेच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होऊन कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. महापालिकेने यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्यास महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने चालना मिळू शकते.


महिला बचत गटांना संधी देणे हा केवळ पुरवठ्याचा विषय नाही. तो महिला सक्षमीकरण, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. जर हा ठेका नवी मुंबईमधील महिलांना दिला, तर त्यातून उद्योजिका निर्माण होतील.
-अभिजित देसाई, नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात लागताच फोन, ओमराजेंना काय सांगितलं? एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

India vs SA World Cup: सुटलेल्या झेलांचा फटका : हरमनप्रीत कौर; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय कर्णधाराची निराशा

Ronaldo: रोनाल्डोच्या फॉर्मवर लक्ष; पोर्तुगालचा आज सामना

CM Vijay Thalapathy Jan Gan Man: विजय थलपतींचा धाडसी निर्णय, तब्बल २५ वर्षांचा नियम मोडला; तामिळ विधानसभेत पहिल्यांदाच राष्ट्रगीत गायले

Petrol-Diesel-CNG Price: 23 जून रोजी देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरात 1 लिटरचा भाव किती?

SCROLL FOR NEXT