माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर पोलिसांच्या ताब्यात
ठाणे पोलिसांचे पथक कोल्हापूरला रवाना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ठाणे महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी पहाटे ताब्यात घेतले. त्यांना ठाण्यात आणण्यासाठी ठाणे पोलिसांचे पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे. याबाबत पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी माहिती दिली.
ठाणे महापालिकेतील एका डेटा एन्ट्री ऑपरेटर महिलेने कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. २०२० ते २०२३ या काळात आहेर यांनी पदाचा गैरफायदा घेत हिरानंदानी इस्टेटमधील फ्लॅटवर बोलावून शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच वारंवार शारीरिक संबंधांची मागणी केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात नाशिकमधील तथाकथित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याचेही नाव समोर आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आहेर फरार होते. अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यानंतर ते कोल्हापुरातील एका लॉजमध्ये आढळून आले. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.