घणसोलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : घणसोली परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीच्या घरात प्रवेश घुसून पीडित मुलीसोबत अश्लील चाळे करीत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. रबाळे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी तरुणाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
घणसोली परिसरात अटक आरोपी उमेश निकाळजे हा तरुण व १५ वर्षीय पीडित मुलगी हे दोघेही राहण्यास आहेत. बुधवारी (ता. ६) सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी घरामध्ये एकटीच असताना आरोपीने शिडीच्या सहाय्याने पीडित मुलीच्या घरात बेडरूममधील गॅलरीत प्रवेश केला. त्यानंतर त्याने पीडित अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे, तर आरोपीने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. या वेळी पीडित मुलीच्या नातेवाइकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपी तरुणाला पकडून रबाळे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी उमेश निकाळजे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला रात्री अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.