मुंबई

उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात तोडफोड

CD

उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात तोडफोड
रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांचा राडा

उल्हासनगर, ता. ७ (वार्ताहर) : उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांनी बुधवारी मध्यरात्री मोठा गोंधळ घालत रुग्णालयात तोडफोड केली. या घटनेमुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भगवान उत्तम निंभोरे (४२) यांना प्रकृती गंभीर असल्याने बुधवारी रात्री उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि काही नागरिकांनी संताप व्यक्त करत रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीचे आरोप केले. त्यानंतर जमावाने आक्रमक होत रुग्णालयातील काचा फोडल्या आणि काही वैद्यकीय उपकरणांचे नुकसान केले. या गोंधळात रुग्णालयातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनाही धक्काबुक्की करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
=====
कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. आरोपींना तत्काळ अटक करावी आणि रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्था वाढवावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्यानंतर महापौर अश्विनी निकम, नगरसेविका सविता तोरणे, समाजसेवक शिवाजी रगडे तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT