मुंबई

निवृत्त नौदल अधिकाऱ्याची ४२ लाखांची फसवणूक

CD

निवृत्त नौदल अधिकाऱ्याची ४२ लाखांची फसवणूक
घरबसल्या कमाईचे प्रलोभन; कोपरखैरणे पोलिसांत गुन्हा दाखल

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : घरबसल्या मोठी कमाई करण्याचे प्रलोभन दाखवत सायबर भामट्यांनी एका निवृत्त भारतीय नौदल अधिकाऱ्याची तब्बल ४२ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
फसवणूक झालेले ६० वर्षीय निवृत्त नौदल अधिकारी कोपरखैरणे सेक्टर ७ परिसरात राहतात. मे २०२५ मध्ये सायबर गुन्हेगारांनी त्यांच्याशी टेलिग्रामद्वारे संपर्क साधला होता. सुरुवातीला गुगल मॅप्सवर विविध हॉटेल्सना रेटिंग देण्याचे सोपे काम देण्यात आले. त्या बदल्यात चांगला आर्थिक परतावा मिळेल, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. यानंतर अधिक नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत आरोपींनी त्यांना विविध बँक खात्यांमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार ३ मे ते २४ मे २०२५ या कालावधीत निवृत्त अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने एकूण ४२ लाख ५१ हजार रुपये पाठवले. मात्र, एवढी मोठी रक्कम गुंतवूनही कोणताही परतावा मिळाला नाही. तसेच गुंतवलेली मूळ रक्कमही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

Sonvi Bridge Accident in Sangameshwar : सोनवी पुलावर दोन ट्रकची धडक; एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतुकीचा फटका; महामार्गावर वाहनांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचे ढग; पुढील काही तास पावसाचा जोर टिकून राहण्याची शक्यता

Mumbai Rain Update: इस्ट टू वेस्ट! वाहतूक कोंडीने मुंबईकर त्रस्त; रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Tukaram Mundhe Crackdown : मुंढेंच्या दणक्याने हॉटेल्सही 'सरळ'! आधी सिलिंडर, आता 'एफडीए'मुळे मेन्यूमध्ये कपात; पनीर, चीज, खवा 'गायब'च

SCROLL FOR NEXT