मुंबई

ठाणे अवतीभवती

CD

तेल सांडल्याने वाहतूक विस्कळित
ठाणे : येथील तीन हात नाका पुलावर माजिवाड्याकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर तेल सांडल्याची घटना घडली. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. या घटनेची माहिती पोलिस हवालदार खर्डे यांनी दिल्यानंतर वाहतूक पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावरील तेलावर माती टाकून घसरण्याचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना केल्या. घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून आवश्यक उपाययोजनांनंतर मार्ग वाहतुकीसाठी खुला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
..........................

ठाण्यात दोन अल्पवयीन मुली बेपत्ता
ठाणे : कळवा व डायघर परिसरातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. डायघर परिसरातील १६ वर्षीय मुलगी २ मे रोजी दुपारी घराबाहेर गेल्यानंतर परत न आल्याने पालकांनी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर कळवा पूर्व येथील १७ वर्षीय मुलगी ६ मे रोजी घरातून कोणालाही न सांगता निघून गेली. तिला ही अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला आहे. डायघर व कळवा पोलिसांनी अपहरणाचे गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.
................

दिवा परिसरात वीजचोरी
ठाणे : दिवा परिसरातील एका वेल्डिंग दुकानात थेट वीज जोडणी करून चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. टोरेन्ट पॉवरचे कर्मचारी अनिकेत देशमुख व तंत्रज्ञ शुभम गोडसे यांनी १७ मार्चला तपासणीदरम्यान वैष्णवी प्लाझा येथील दुकानात वीजमीटर नसल्याचे आढळले. तपासात सिंटेक्स बॉक्समधून दोन वाहिन्यांद्वारे थेट वीजपुरवठा घेतल्याचे निदर्शनास आले. या जोडणीवर ट्युबलाईट, पंखा, ड्रिल मशीन, वेल्डिंग मशीन, कटर मशीन व ग्राइंडर असा सुमारे सात हजार ९४० वॅटचा दाब वापरला जात होता. दुकानचालक अजय वर्मा व मालक नैनेश वारेकर यांच्याविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
..........

पत्नीला मारहाणप्रकरणी पतीविरोधात तक्रार
ठाणे : मुंब्रा परिसरात पत्नीने पतीचा मोबाईल पाहण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. पत्नी प्रणिता (२१) यांच्या तक्रारीवरून पती मनोज याच्याविरोधात मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, ५ मे रोजी पहाटे पती घरी आल्यानंतर प्रणिता यांनी त्यांचा मोबाईल पाहण्यासाठी घेतला. याचा राग आल्याने मनोज याने शिवीगाळ करत तिच्या अंगावर लघुशंका केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्याने काठीने पत्नीला मारहाण केली. यात प्रणिताला दुखापत झाली. आरडाओरड ऐकून सासरे व दीर यांनी मध्यस्थी करत भांडण सोडविले. त्यानंतर प्रणिता माहेरी गेल्या आणि आईसह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
...............

रिक्षाचालकाला मारहाण
ठाणे : जुन्या वादाच्या कारणावरून रिक्षाचालकाला मारहाण केल्याची घटना मुंब्र्यात घडली. असम अस्लम शेख (३५) यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, ६ मे रोजी सायंकाळी घरातील सामान स्थलांतरित करत असताना त्याच इमारतीत राहणारा अमीन एहमद शेख याने जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांना धक्का देत मारहाण केली. यात असम शेख यांचा ओठ फाटला; तसेच शरीरावर दुखापत झाली. यावेळी अन्य दोघांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे. झटापटीत दोन मोबाईलचे नुकसान झाले. जखमीवर कळवा रुग्णालयात उपचार करण्यात आले असून पुढील तपास मुंब्रा पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : डीएमकेने आज आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेक ठराव मंजूर केले

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT