डोंबिवलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
मृतदेह तब्बल चार दिवस घरातच पडून
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर परिसरात ३१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे, संबंधित तरुणाचा मृतदेह तब्बल चार दिवस घरातच पडून होता. घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि हा प्रकार समोर आला.
लोकेश सूर्यकांत निकम (वय ३१) असे मृत तरुणाचे नाव असून, तो उमेशनगरमधील शिवदीप निवास चाळीत, नीलकमल बंगल्याजवळ राहत होता. तो प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत होता. त्याचे लग्न झाले नव्हते. घटनेच्या वेळी त्याचे आई-वडील सातारा येथे गावी गेले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून लोकेश कोणाच्याही संपर्कात नव्हता. त्याचा मोबाईल बंद लागत असल्याने आई-वडिलांना संशय आला. त्यांनी शेजारी राहणारे विजय सावंत यांना घरी जाऊन चौकशी करण्यास सांगितले. सावंत लोकेशच्या घरी गेले असता घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी तातडीने विष्णूनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडत घरात प्रवेश केला असता लोकेशचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, लोकेशचा मित्र ऋषिकेश याचा नुकताच आधारवाडी कारागृहात मृत्यू झाला होता. त्यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विष्णूनगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.