मुंबई

अगरवाल रुग्णालय कर्मचारी वसाहतीच्या पुनर्विकासाला गती

CD

अगरवाल रुग्णालय कर्मचारी वसाहतीच्या पुनर्विकासाला गती
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी; ३८ मजली दोन, २२ मजली एक इमारत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुलुंड येथील एम. टी. अगरवाल रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीच्या पुनर्विकासाला गती मिळाली आहे. ३८ मजली दोन तर २२ मजली एक इमारत असून, वन बीएचके, टू बीएचके व चार बीएचके फ्लॅट पार्किंगच्या सुविधेसह उपलब्ध होणार आहेत. यासाठी २२२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याने ऑक्टोबर २०२७ पर्यंत डॉक्टर, रजिस्टार निवासी इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
मुंबई महापालिकाच्या आरोग्य पायाभूत सुविधा बळकटीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मुलुंड (पश्चिम) येथील एम. टी. आगरवाल रुग्णालयासाठी अत्याधुनिक कर्मचारी वसाहत उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. डॉक्टर, निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक निवास इमारती उभारण्यात येत आहे.
मुलुंड येथील सीटीएस क्रमांक १०२९ व १०३० या भूखंडावर सुमारे ३३४०.२ चौरस मीटर जागेत हा प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पात ए बी व सी अशा तीन विंग असणार आहेत. इमारतींत बेसमेंट, ग्राउंड, चार पोडियम असणार आहे.

असे होतंय बांधकाम
- विंग ए : ३८ मजली इमारत, १२८ (१ बीएचके) फ्लॅट्स
- विंग बी : २२ मजली इमारत, ५६ (२ बीएचके) फ्लॅट्स आणि १ (४ बीएचके) फ्लॅट
- विंग सी : ३८ मजली इमारत, १९० वैद्यकीय अधिकारी रूम्स (सिंगल व ट्विन शेअरिंग)
- एकूण ३७४ निवासी घरे उपलब्ध होणार आहेत.
- सामायिक पोडियम, १० लिफ्ट्स आणि ७८ पार्किंग सुविधा

रुग्णसेवेची गुणवत्ता उंचावण्यास मदत
या प्रकल्पामुळे रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना कार्यस्थळाजवळच निवास उपलब्ध होणार असून, आपत्कालीन सेवांमध्ये तत्परता वाढणार आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांना पूरक अशा निवासी प्रकल्पामुळे रुग्णसेवेची गुणवत्ता उंचावण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT