सिद्धार्थ रात्रशाळा बंद करू नका!
मंत्री आठवलेंची सरकारकडे मागणी
मुंबई, ता. ७ ः संचमान्यता आणि विविध प्रकारच्या जाचक नियमांमुळे संकटात सापडलेल्या मुंबईतील रात्रशाळा बंद होत असल्याने त्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी चिंता व्यक्त केली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली फोर्ट परिसरातील सिद्धार्थ नाइट हायस्कूल ही रात्रशाळा कोणत्याही परिस्थितीत बंद करू नये, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
गोरगरीब कष्टकरी व कामगारवर्गाला सुटलेले शिक्षण घेता यावे म्हणून १९४६ मध्ये पिपल्स एज्युकेशन सोसायटीने सिद्धार्थ नाइट हायस्कूल सुरू केले. यात इयत्ता ८ ते १०वी वर्ग असलेले हे नाइट हायस्कूल गेली ८० वर्षे सुरू आहे. या शाळेत सध्या येथील तिन्ही वर्गांत प्रत्येकी २०पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक वर्गात अपेक्षित पटसंख्या असूनही शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी येथील शिक्षकांचे इतरत्र समायोजन करण्यासाठी नोटिसा दिल्या असल्याने ही शाळा आपोआपच बंद केली जाणार आहे. यामुळे ही शाळा बंद करू नये, अशी मागणी मंत्री आठवले यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. तसेच रात्रशाळेत आवश्यक पटसंख्या असूनही ती बंद पाडण्याचा घाट घालणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही आठवले यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.