एफडीएची प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम
मुंबई, ता. ७ : अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यभरात प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात मोठी कारवाई करत गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला आणि तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक व विक्रीवर धडक मोहीम राबवली आहे. एप्रिल महिन्यात राज्यभरात १९० ठिकाणी छापे टाकण्यात आले असून, २८८ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच १५९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे पाच कोटी ७२ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या उत्पादक व विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
भांडुप परिसरात बनावट दुग्धजन्य पेय प्रकरण उघडकीस आले आहे. दुग्धजन्य पेयांच्या नावाखाली संशयास्पद द्रवपदार्थ तयार करून विक्री केल्याची माहिती मिळाल्यानंतर एफडीए आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात संशयित द्रव पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
सहआयुक्त (अन्न) यांनी नागरिकांना आवाहन करताना प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या उत्पादन, साठवणूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास प्रशासनाला कळवावे, असे सांगितले. जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.