मुंबई

मेळघाट प्रकरण :

CD

नागरिकांसह प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करा!
उन्हाच्या तीव्रतेवरून न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

मुंबई, ता. ७ ः विदर्भात मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखा बसत आहे. त्यामुळे मेळघाट परिसरातील नागरिक आणि प्राण्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही याकडे लक्ष द्या, असा पुनरुच्चार गुरुवारी उच्च न्यायालयाने (ता. ७) केला. मेळघाटात टँकरने पाणीपुरवठा करता येईल का, अशी विचारणा मागील सुनावणीवेळी न्यायालयाने केली होती. त्या पार्श्वभूमीवर न्या. रवींद्र घुगे आणि न्या. हितेन वेणेगावकर यांच्यापुढे आज सुनावणी झाली.
याचिकाकर्त्यांनी सुचवलेल्या धारणी, चिखलदरा येथील ३३ गावांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी अनेक गावात पाणीपुरवठा नियमित सुरू असल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील भूपेश सामंत यांनी दिली. तसेच नऊ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचेही सचित्र सांगितले; परंतु याचिकाकर्त्यांनी सरकारच्या युक्तिवादावर आक्षेप नोंदवला. अद्याप अनेक भागांत पाणीटंचाई असल्याची माहिती ॲड. जुगलकिशोर गिल्डा यांनी दिली, तर धारणीतील एका रुग्णालयात पाणी उपलब्ध होण्यासाठी सरकारकडे वारंवार निवेदन देऊनही वर्षभरापासून काहीच निर्णय झाला नसल्याचे डॉ. आशीष पालव यांनी न्यायालयाला सांगितले.
----
दोन्ही युक्तिवादात तफावत
सरकारच्या मते पाण्याची कमतरता नाही, तर याचिकाकर्त्यांच्या मते अनेक गावात पाणी नाही. दुसरीकडे सरकारने सादर केलेल्या फोटोंमध्ये पाणी वाहून जात असल्याचे दिसते. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या युक्तिवादात तफावत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले; मात्र या सगळ्यात सर्वसामान्य आणि प्राण्यांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या, असे न्यायालयाने सुचवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणे पोलिसांच्या रडारवरील 'बबलू' कोण? इन्स्टाग्रामवर फोटो टाकायचा, अन् गुपचूप चालायचा पिस्तुलांचा धंदा; अखेर पकडला

Vaibhav Sooryavanshi पर्यंत रघूनं पोहचवली टीम इंडियाची जर्सी, १५ वर्षांच्या पोराची कशी होती रिऍक्शन? BCCI ने शेअर केला Video

Samruddhi Mahamarg Accident : फॉर्च्युनर सळ्यांच्या कंटेनरला मागून धडकली; डॉक्टर पतीसह पत्नीचा मृत्यू, मुलांसह तिघे जखमी

कोण आहेत जॉर्ज कुरियन? केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? कारण आलं समोर

Power Supply Restoration: शेतकऱ्यांना दिलासा! उपसा सिंचन बंदी २६ जूनपर्यंत शिथिल; महावितरणला वीज कनेक्शन तत्काळ चालू करण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT