मुंबई

सोहराबुद्दीन प्रकरणाचा घटनाक्रम

CD

सोहराबुद्दीन प्रकरणाचा घटनाक्रम
-----
२२ नोव्हेंबर २००५ : सोहराबुद्दीन शेख, त्याची पत्नी कौसर बी आणि सहकारी प्रजापती हे हैदराबादहून सांगलीला जात असताना गुजरात पोलिसांनी बसमधून त्यांना ताब्यात घेतले.
२२ ते २५ नोव्हेंबर २००५ : सोहराबुद्दीन आणि कौसर बी यांना अहमदाबादजवळील एका फार्महाउसमध्ये, तर प्रजापतीला उदयपूरच्या तुरुंगात डांबण्यात आले.
२६ नोव्हेंबर २००५ : गुजरात पोलिसांच्या कथित बनावट चकमकीत सोहराबुद्दीनचा खात्मा केला.
२९ नोव्हेंबर २००५ : कौसर बीचीही पोलिसांनी कथितरीत्या हत्या करून मृतदेह जाळून नष्ट केला.
२७ डिसेंबर २००६ : राजस्थान आणि गुजरात पोलिसांनी प्रजापतीला उदयपूरहून ताब्यात घेतले आणि चकमकीत प्रजापतीचा खात्मा.
२००५-२००६ : सोहराबुद्दीनच्या कुटुंबीयांनी चकमकीच्या चौकशीची आणि कौसर बी नेमकी कुठे आहे, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव; गुजरात सीआयडीला प्रकरणाचा तपास करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश.
३० एप्रिल २००७ : गुजरात सीआयडीने सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर; कौसरचा मृत्यू झाल्याचे आणि मृतदेह जाळून टाकल्याची माहिती.
जानेवारी २०१० : सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला.
२३ जुलै २०१० : सीबीआयकडून याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल.
२७ सप्टेंबर २०१२ : सोहराबुद्दीन खटला सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबईत वर्ग.
ऑक्टोबर २०१७ : मुंबई विशेष सीबीआय न्यायालयाकडून २२ आरोपींवर आरोप निश्चित. बहुतांश आरोपी गुजरात आणि राजस्थानमधील पोलिस.
नोव्हेंबर २०१७ : सीबीआय न्यायाधीश एस. जे. शर्मासमोरील सुनावणीत २१० साक्षीदारांची तपासणी; त्यापैकी ९२ साक्षीदार फितूर.
२३ नोव्हेंबर २०१८ : न्यायालयाने साक्षीदारांची तपासणी आणि आरोपींचे जबाब नोंदवले.
५ डिसेंबर २०१८ : दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण; न्यायालयाने निकाल राखून ठेवला.
२१ डिसेंबर २०१८ : पुरावे सिद्ध करण्यास अपयशी ठररल्याचे कारण देऊन सीबीआय न्यायालयाने २२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
जानेवारी २०१९ : शेखच्या कुटुंबीयांचे सीबीआयला निर्णयाविरुद्ध अपील करण्याची विनंती.
एप्रिल २०१९ : सोहराबुद्दीनच्या बंधूंकडून उच्च न्यायालयात अपील.
जून २०१९ : उच्च न्यायालयाने अपील स्वीकारले.
ऑक्टोबर २०२५ : सीबीआय न्यायालयाच्या निकालास आव्हान देणार नसल्याचे सीबीआयचे स्पष्टीकरण.
१६ जानेवारी २०२६ : उच्च न्यायालयाने अपिलांवरील निकाल राखून ठेवला.
७ मे २०२६ : न्यायालयाने शेखच्या बंधूंचे अपील फेटाळले. २२ आरोपींच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय कायम.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT