मुंबई

टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाची नियोजित बैठक होणार

CD

टाटा ट्रस्टच्या बैठकीचा मार्ग मोकळा
तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : सर रतन टाटा ट्रस्ट संचालक मंडळाची शुक्रवारी (ता. ८) होणाऱ्या बैठकीला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. ७) नकार दिला.
ट्रस्टशी संबंधित ठाण्यातील सुरेश पाटील-खेडे यांनी याचिका केली. ट्रस्टकडून कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचा दावा याचिकेत केला आहे. तसेच शुक्रवारी होणाऱ्या प्रस्तावित संचालक मंडळाच्या बैठकीतून उद्‍भवणारा किंवा त्याच्याशी संबंधित कोणताही निर्णय ट्रस्टच्या विश्वस्तांनी मंजूर किंवा त्याची अंमलबजावणी करू नये, असा आदेश देण्याची मागणी केली होती. मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने मात्र याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी फेटाळली; मात्र याचिकाकर्त्यांना पुढील आठवड्यात सुट्टीकालीन न्यायालयापुढे याचिका करण्याची मूभाही न्यायालयाने दिली. पाटील-खेडे यांनी याचिकेच्या माध्यमातून ट्रस्टच्या संचालक मंडळाची पुनर्रचना करण्याचे आदेशाची मागणी केली होती. ही अग्रगण्य सार्वजनिक धर्मादाय संस्था महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमातील २०१५च्या सुधारणेचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Hidkal Reservoir Fort : 50 वर्षांनंतर हिडकल जलाशयातून बाहेर आलं मोठं रहस्य; पाणी आटताच समोर आला थरारक इतिहास, 'या' किल्ल्याची स्थापत्यकला पाहून थक्क व्हाल

Tax Refund: आता अवघ्या 7 दिवसांत खात्यात जमा होणार टॅक्स रिफंड! पण त्याआधी 'हे' काम करणे आवश्यक

Latest Marathi News Live Update : स्मार्ट मीटर सक्ती विरोधात यवतमाळमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

SCROLL FOR NEXT