रीलच्या नादात पक्ष्यांची अंडी, मुंग्यांवर ताव
ठाण्याच्या ‘बिअर ग्रिल’चा व्हिडिओ व्हायरल; वनविभागाची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी स्वतःला ‘ठाण्याचा बिअर ग्रिल’ म्हणवून घेणाऱ्या एका तरुणाने येऊरच्या जंगलातील पक्ष्यांची अंडी आणि मुंग्या खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्या या स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने गंभीर दखल घेत संबंधित तरुणावर कारवाई केली आहे.
‘व्हीआयपी क्लिक्स’ नावाने इन्स्टाग्राम अकाउंट चालवणारा हा तरुण जंगलातील फळे, झाडांची पाने, कीटक यांचे सेवन करत व्हिडिओ तयार करत होता. अलीकडेच त्याने ठाण्यातील येऊर परिसरात जाऊन मुंग्या खातानाचे तसेच पक्ष्यांची अंडी फोडून खातानाचे चित्रीकरण केले होते. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. ‘फॉलोअर्स’ आणि ‘व्ह्यूज’साठी जंगलातील नैसर्गिक परिसंस्थेशी खेळणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित करण्यात आला. विशेषतः पक्ष्यांची अंडी नष्ट करणे आणि त्याचे सोशल मीडियावर उदात्तीकरण करणे धोकादायक असल्याची टीका करण्यात आली. वनविभागाने या प्रकरणाची चौकशी सुरू करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आहे.
सार्वजनिक माफी
त्या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर वनविभागाने समाजमाध्यमांवर सार्वजनिकरीत्या माफी मागण्यास सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट करत ‘कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. कोणीही माझ्या कृतीची नक्कल करू नये,’ असे म्हणत दिलगिरी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.