मुंबई

टीसीएस धर्मांतर प्रकरणातील निदा खान अटकेत

CD

टीसीएस धर्मांतर प्रकरणातील निदा खान अटकेत
दीड महिन्यांपासून फरार; छत्रपती संभाजीनगरातून एसआयटीची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नाशिक, ता. ७ : बहुराष्ट्रीय आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमधील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण व धर्मांतराच्या प्रयत्न प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरुवारी (ता. ७) रात्री छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. ती गेल्या दीड महिन्यांपासून फरार होती.

या प्रकरणातील तपासासाठी एसआयटीची विविध पथके तिच्या मागावर होती. दरम्यान, निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री सापळा रचून तिला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. पोलिस तपासानुसार, टीसीएसमधील काही महिला कर्मचाऱ्यांचे कथित ब्रेनवॉश करून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. यामध्ये निदा खानची भूमिका महत्त्वाची असल्याचा संशय आहे. पीडित महिलांना नमाज पठण, बुरखा परिधान करणे याबाबत माहिती देणे, तसेच मुस्लिम धर्माशी संबंधित पुस्तके उपलब्ध करून देणे, हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणे आणि मुस्लिम धर्माचे गुणगान करणे, अशा माध्यमांतून धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना अटक केली असून, त्यामध्ये पुण्यातील एचआर हेड अश्विनी चैनानी हिचाही समावेश आहे. शहर आयुक्तालयात यासंदर्भात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.

मुख्य संशयित असलेली निदा खान गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होती. तिने नाशिक रोड सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता; मात्र गेल्या आठवड्यात न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

SCROLL FOR NEXT