अवकाळी पावसाने घरदार उघड्यावर
मोखाड्यातील घराचे नुकसान
मोखाडा, ता. ८ (बातमीदार) ः घानवळ गावातील रहिवासी रामजी नडगे यांच्या घरावरील पत्रे गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने उडाले. या घटनेमुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे.
मोखाडा परिसरात गुरुवारी दुपारी २ वाजल्यानंतर वातावरणातील बदलांबरोबर मुसळधार पावसाने हजेरी लावली. या वेळी सोसाट्याच्या वाऱ्याने नडगे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले. या वेळी घरात महिला, लहान मुले तसेच कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. लहान मुलांसह महिलांच्या आक्रोशामुळे काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला.
पावसाने नडगे यांच्या घरातील धान्य, कपडे, शालेय साहित्य, भांडी तसेच जीवनावश्यक वस्तू भिजल्या आहेत.
-------------------------
दोन वेळच्या जेवणाची भ्रांत
हलाखीची परिस्थिती असलेल्या नगडे कुटुंब उदरनिर्वाहासाठी रोजंदारीवर काम करतात. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तात्पुरत्या स्वरूपात पत्रे, अन्नधान्याची मदत केली; पण कुटुंबात तब्बल आठ सदस्य असून राहण्याचा तसेच दोन वेळच्या जेवणाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने तातडीने मदतीची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.