मुंबई

बिना फुरट्याडो व आरोग्य समिती सभापतिपदी निलेश देशमुख विजयी

CD

सभापतिपदांवर बविआचे वर्चस्व
बिना फुरट्याडो, नीलेश देशमुख विजयी

विरार, ता. ८ (बातमीदार) ः महिला व बालकल्याण समिती, आरोग्य समिती सभापती निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या बिना फुरट्याडो, नीलेश देशमुख निवडून आले आहेत. पीठासीन अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली.
महिला व बालकल्याण आणि आरोग्य समिती सभापतिपदाची निवडणूक बहुजन विकास आघाडीला भाजपमध्ये थेट लढत झाली. महिला व बालकल्याण समितीवर १६ सदस्यांपैकी एक सदस्य गैरहजर राहिल्याने निवडणुकीत बिना फुरट्याडो यांना नऊ तर भाजपच्या सानवी यंदे यांना पाच मते मिळाली. तर उपसभापतिपदासाठी निवडणुकीत बहुजनच्या सुवर्णा पाटील यांना नऊ तर भाजपच्या मीना निकम यांना पाच मते पडली. आरोग्य समितीसाठी झालेल्या निवडणुकीत बविआच्या नीलेश देशमुख यांना १० मते मिळाली, तर भाजपच्या डॉ. योगिता करंजकर यांना सहा मते मिळाली. उपसभापतिपदासाठी झालेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या निषाद चोरगे यांना १० मते मिळाली तर भाजपकडून जितेंद्र राऊळ यांना सहा मते मिळाली.
------------------
उमेदवारांचे अभिनंदन
महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपीस, सभागृहनेता प्रफुल साने, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, माजी महापौर नारायण मानकर, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांनी उमेदवारांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT