मुंबई

गॅस महागाईने खानावळ आणि फास्टफूड व्यवसाय होरपळला

CD

गॅस दरवाढीने चहा टपऱ्या, वडापाववाल्यांचे गणित बिघडले
अनेक छोटे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : आधीच सिलिंडरचा तुटवडा आणि त्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात झालेल्या प्रचंड वाढीमुळे करायचे तरी काय, हा प्रश्न शहरातील हजारो चहा टपरीधारक, वडापाव विक्रेते, घरगुती मेस चालक आणि छोट्या हॉटेल व्यावसायिकांपुढे उभा आहे. खाद्यपदार्थाचे दर वाढवल्यास ग्राहक कमी होतील आणि न केल्यास व्यवसाय गुंडाळावा लागेल अशा दुहेरी कात्रीत ते सापडले आहेत.
अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थितीनुळे जागतिक इंधन पुरवठा विस्कळित झाला आहे. गॅस सिलिंडरचे दर थेट ९९३ रुपयांनी वाढल्यामुळे या व्यावसायिकांंना मोठा फटका बसला आहे. आधीच नफ्याचे मार्जिन कमी, त्यात दरवाढ झाल्यामुळे व्यवसायाचे गणित कोलमडल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चहा, नाश्ता आणि खानावळीतील दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत किंवा वाढवावे लागणार आहेत. मात्र, त्यामुळे ग्राहकसंख्येवर परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
गॅसपुरवठा विस्कळित झाल्यामुळे यापूर्वीच १० ते २० टक्के हॉटेल्स बंद पडल्याचे ‘आहार’ या संघटनेकडून सांगण्यात आले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास व्यवसाय बंद पडण्याची भीती या व्यावसायिकांना आहे. त्यामुळे ही दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी या व्यावसायिकांची आहे.

दररोज शंभर लोकांसाठी स्वयंपाक करते. गॅस महाग झाल्यामुळे जेवणाचे दर वाढवावे लागत आहेत, पण विद्यार्थी व कामगारवर्गाला ते परवडत नाही. अशीच परिस्थिती राहिली, तर खानावळ बंद करण्याची वेळ येईल.
- आशा कदम, चालक, शकुंतला खानावळ, चेंबूर

खाद्यतेल, गॅस सगळंच महाग झालंय. वडापाव पाच रुपयांनी महाग केला आहे, पण ग्राहकांना वाढलेला दर मान्य नाही. त्यामुळे दररोज वादावादी होते.
- हरिष चौबे, जम्बो वडापावविक्रेते, भांडुप

गॅसचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय. आधी १५ रुपयांचा चहा आता २५ रुपयांना विकावा लागतोय. दर वाढवले तर ग्राहक कमी होतात आणि स्थिर ठेवले तर खर्च निघत नाही.
- मुकेश भाई, चहाविक्रेता, कुर्ला नेहरूनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

Nagpur Crime : खापरखेड्यात मनोरुग्णाचा पोलिसांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; दोघे शिपाई जखमी

SCROLL FOR NEXT