अलिबागमध्ये विद्युत खांब कोसळला
मोठी दुर्घटना थोडक्यात टळली
अलिबाग, ता. १२ (वार्ताहर) : अलिबाग शहरातील अरुणकुमार वैद्य माध्यमिक विद्यालय परिसरात, हॉटेल नित्यानंद येथील वळणावर गुरुवारी सायंकाळी अचानक विद्युत खांब कोसळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.
खांब कोसळण्याच्या काही सेकंद आधीच एक महिला त्या ठिकाणाहून पुढे गेली होती, तर एक वाहनही त्या मार्गावरून निघून गेले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. हा परिसर शाळा, हॉटेल आणि निवासी भागामुळे कायम वर्दळीचा असतो. माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक आणि नगरसेवक अंकित बंगेरा यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
स्थानिक नागरिकांनी शहरातील जुने व गंजलेले विद्युत खांब तातडीने बदलण्याची मागणी केली आहे. पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने धोकादायक खांबांचे सर्वेक्षण करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
फोटो ओळ ः
अलिबाग शहरातील अरुणकुमार वैद्य हायस्कूलसमोर असलेल्या रस्त्यावर असलेला विद्युत खांब कोसळलेल्या अवस्थेत दिसत आहे.
(छायाचित्र ः अमुलकुमार जैन)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.