मुंबई

मालवणीतील मुख्य नाल्याची सफाई रखडली;

CD

मालवणीतील मुख्य नाल्याची सफाई रखडली; पूरस्थितीची भीती
मालाड, ता. ८ (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील मुख्य नाल्याची सफाई अद्याप सुरू न झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी पालिकेकडून नाला सफाईचे काम सुरू करण्यात आलेले नाही.
मालवणीतील हा प्रमुख नाला म्हाडा वसाहत, एमएचबी कॉलनी, स्क्वॉटर कॉलनी, नवीन व जुने कलेक्टर कंपाउंड तसेच कच्चा रस्ता परिसरातून वाहत जाऊन मिठ चौकी येथील मुख्य नाल्यात मिळतो. या नाल्यावर पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाण्याचा भार असल्याने वेळेत सफाई न झाल्यास परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईतील इतर अनेक भागांत नालेसफाईची कामे वेगाने सुरू असताना मालवणीतील मुख्य नाल्याकडे मात्र पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचलेला दिसत आहे.
“जर नाल्याची सफाई वेळेत झाली नाही आणि पावसाने लवकर हजेरी लावली, तर नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान होऊ शकते,” अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
पालिका प्रशासनाने तातडीने नाला सफाईचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

IndiGo Cabs : इंडिगोची कॅब सर्व्हिस सुरू! एअरपोर्ट पिकअप-ड्रॉप फक्त 49 रुपयांमध्ये, कसं बुक करायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT