चपलांचे दुकान हलवल्यामुळे चर्मकार बांधवांचा संताप
धारावी, ता. ८ (बातमीदार) : माहीम पश्चिम येथील लेडी जमशेदजी रस्त्यावरील शितळा देवी मंदिराच्या समोर, बांबुळी निवास येथील पदपथावरील माने चपलांचे दुकान हे काही समाजकंटकांनी त्यांच्या परवानगीशिवाय हलवल्याचा आरोप या दुकानाचे मालक तानाजी माने यांनी केला आहे. आपले हे दुकान तब्बल २०० फूट लांब दुसऱ्या इमारतीच्या फुटपाथवर नेऊन ठेवल्याची तक्रार त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. याबाबत चर्मकार बांधवांनीही संताप व्यक्त केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे या दुकानाचा परवाना तब्बल ४० वर्षे जुने आहे. या दुकानाचे मालक माने हे येथे गटई काम, छत्री व बॅग दुरुस्तीचे काम करतात. माने यांचे दुकान जिथे आहे, तेथील भागात काही विकसकाचे कार्य सुरू असून, सदर दुकान काही महिन्यांसाठी हलवण्याची माहिती माने यांना मिळाली. त्यांनी ही माहिती राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांना दिली. त्यांनी हस्तक्षेप करत एका महिन्यासाठी हे दुकान थोडे बाजूला सरकवण्याची तयारी दाखवली व विकसकाचे काम झाले असता ते मूळ ठिकाणी ठेवण्याची तयारी दर्शवण्यात आली.
दरम्यान, काही दिवसांनी माने यांचे दुकान अचानकपणे २०० फूट लांब ठेवण्यात आले. आपले दुकान आपल्या परवानगीशिवाय हलवल्याचे कळताच माने यांनी ही माहिती बाबूराव माने यांच्या कानावर घातली. त्यांनी याबाबत राष्ट्रीय चर्मकार संघाचे धारावी तालुका अध्यक्ष दिलीप गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष विजय खरात, कार्याध्यक्ष शंकर बळी व हेमंत बामणे यांना घटनास्थळी पाठवले. या पदाधिकाऱ्यांनी ‘जी’ नॉर्थ प्रभाग कार्यालय गाठत परवाना अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून देत मदतीची विनंती केली. त्यांनी माने यांचे दुकान पूर्वीच्या ठिकाणी पुन्हा ठेवण्यात येण्याची विनंती केली असून, तसे न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.