मुंबई

अक्षय दया मोहिते यांची ''बिल्लाबाँग'' कादंबरी प्रकाशित

CD

अक्षय दया मोहिते यांची ‘बिल्लाबाँग’ कादंबरी प्रकाशित

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : ‘बिल्लाबाँग’ ही आशय, कथा, आसमंत आणि अन्वयार्थ यातून सध्याच्या समाजाचे वास्तव, जुन्या परंपरा छेदत ढसाळ परंपरेत मांडणारी कादंबरी आहे. आजचे अर्धनागरी जीवन, त्यातील बहुजनांचे आणि अभिजनांचे विश्व या दोन्हीमधील जग अन् तिथली माणसे अक्षय दया मोहिते यांनी अचूक टिपली आहेत. ही मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी ठरेल, असे प्रतिपादन कवयित्री नीरजा यांनी केले.
‘यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान शरद पवार इन्सपायर फेलोशिप २०२६’ अंतर्गत, अक्षय दया मोहिते लिखित व ‘ ललित प्रकाशन’ प्रकाशित ‘बिल्लाबाँग’ या कादंबरीचा प्रकाशन सोहळा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस येथे दिमाखात पार पडला. प्रकाशन समारंभाला कवयित्री नीरजा, ज्येष्ठ समीक्षक मुकुंद कुळे, एनसीपीयेचे आर्ट प्रलेखन अधिकारी डॉ. सुजाता जाधव तसेच दत्ता बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी श्रीनिवास नार्वेकर, सुधीर चित्ते यांनी कादंबरीच्या काही भागाचे अभिवाचन केले.
या वेळी ज्येष्ठ लेखक अरुण शेवते, प्रा. मंगेश बनसोड, लेखिका श्यामल गरुड, लेखक डॉ. श्रीधर पवार, दिग्दर्शक विजय कळमकर, कवी अविनाश गायकवाड, अविनाश उषा वसंत, युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रदीप कोकरे, कवयित्री लक्ष्मी यादव साहित्यिक प्रा. अविनाश कोल्हे, यांसह साहित्यिक, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
------------------
पारंपरिक संकेत तोडणारी कादंबरी
या वेळी बोलताना समीक्षक मुकुंद कुळे म्हणाले, ही कादंबरी भाऊ पाध्ये आणि जी. के. ऐनापुरे यांच्या भाषेला पुढे नेणारी असून, निमशहरी संस्कृतीतील तरुणांचे विश्व प्रकर्षाने मांडते. सध्याच्या मराठी साहित्यात ही कादंबरी भाषेचे सर्व पारंपरिक संकेत तोडत आपले म्हणणे प्रखरपणे मांडते. ही कादंबरी वाचताना एखादी दर्जेदार ‘वेबसीरिज’ पाहत असल्याचा अनुभव येतो, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

Nagpur Crime : खापरखेड्यात मनोरुग्णाचा पोलिसांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; दोघे शिपाई जखमी

SCROLL FOR NEXT