मुंबई

‘ई-स्पर्श’चा एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांना फटका

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : जलजीवन मिशन व स्वच्छता भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांपासून वेतन रखडल्याचे नुकतेच समोर आले आहे. यानंतर आता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांचेही दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. ई-स्पर्श या नव्या प्रणालीचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीवर अधिकारी आणि कर्मचारी काम करीत आहेत. राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योगदान दिले. तुटपुंजे मानधन ते ही वेळेत मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहाय्यक, काउन्सेलर, वैद्यकीय अधिकारी आदी एक हजार १०० कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे वेतन रखडल्याची माहिती सूत्रांनी दिली. महागाईच्या काळात पगारविना संसाराचा गाडा ओढणे कठीण होत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Dina Patil Controversy : खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोरच अर्वाच्य शिव्या

Tax Refund: आता अवघ्या 7 दिवसांत खात्यात जमा होणार टॅक्स रिफंड! पण त्याआधी 'हे' काम करणे आवश्यक

Latest Marathi News Live Update : अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या पक्षात पक्षप्रवेश

Inspirational success story : दोन्ही हात नसतानाही नशिबाशी 'दोन हात'; पन्हाळ्याची लेक माऊली आडकूर बनली मुंबई महापालिकेत अधिकारी

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

SCROLL FOR NEXT