गुणवंतांवर अभिनंदनाचा वर्षाव
विक्रमगड तालुक्यातील दहावीचा ९१.९८ टक्के निकाल
विक्रमगड, ता. ८ (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या शालांत परीक्षेत तालुक्याचा निकाल तब्बल ९१.९८ टक्के लागला आहे. या परीक्षेत मुलांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल पालक, शिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
विक्रमगड तालुक्यातून २,१४५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २,१२२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले होते. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये १,०७७ मुली, १,०४५ मुलांचा समावेश होता. निकालात १,९५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १,०१९ मुली, ९३३ मुलांचा समावेश आहे. यंदाही मुलींनी आपली गुणवत्ता सिद्ध करत मुलांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, तालुक्यातील ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी मर्यादित साधनसामग्रीमध्ये अभ्यास मेहनतीच्या जोरावर यश मिळविल्याने कौतुक होत आहे.
------------------------
शाळांची जोरदार कामगिरी
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, विक्रमगड हायस्कूल विक्रमगड, अरविंदा स्मृती आश्रमशाळा, आदर्श विद्यालय उटावली, साखरे हायस्कूल, साखरे आश्रमशाळा, भडांगे हायस्कूल वाकी तसेच माध्यमिक आश्रमशाळा माण शाळांचा निकाल विशेष उल्लेखनीय ठरला आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये एकमेकांना शुभेच्छा देत आनंद साजरा केला. तसेच मुलांच्या यशाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.