मुंबई

महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मुंब्र्यात कँडल मार्च

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातही लहान मुलींवर अमानुष अत्याचार केले जात आहेत. अत्याचार करणाऱ्या नराधमांना फासावर लटकवावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या सुचनेनुसार तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महिलाध्यक्ष, नगरसेविका मनीषा भगत यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे कँडल मार्च काढण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन ते चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि तिची निर्घृण हत्या या घटनेविरोधात हा कँडल मार्च काढण्यात आला. मुंब्रा स्थानक ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकदरम्यान काढलेल्या मार्चमध्ये शेकडो महिला-लहान मुली सहभागी झाल्या होत्या. भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे अत्याचारात बळी पडलेल्या चिमुकलीला आदरांजली अर्पण करून कँडल मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी भगत म्हणाल्या, नसरापूर, अकोला, ठाणे येथे नराधमांनी लहान मुलींना लक्ष्य केले आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंगा केला होता. त्याच महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगाराला कोणतीही जात धर्म नसतो. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या लहान मुलीचा काय दोष होता? असा सवाल करताना घटनेतील नराधमाला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही

Pune Crime: साखरपुड्यानंतर केतनला आलेली शंका, सियाचं बॅकग्राउंड माहितीय का? वडिलांना केलेली विचारणा पण...

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मोठी घडामोड! सुनावणीत राज्य सरकारचा युक्तिवाद; पूर्वीच्या आयोगातील त्रुटी दूर झाल्याचा दावा

Nashik Girl Death VIDEO : लस टोचून घेतल्यानंतर चक्कर येऊन पडली, 16 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत; दक्षिणमुखी हनुमान मंदिर परिसरातील घटना

Karad Flyover Update : पुणे-बंगळूर महामार्गावरील कराडचा उड्डाणपूल कधीपासून सुरू होणार? तीन दिवसांची चाचणी पूर्ण; पुलावर सध्या काय काम सुरुये?

SCROLL FOR NEXT