मुंबई

दहावीमध्ये मुलींचाच बोलबाला

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (ता. ८) दहावीचा निकाल जाहीर केला. ठाणे जिल्ह्याने यंदा ९५.०४ टक्के निकालाची नोंद करत उत्तम यश मिळवले असले, तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात किंचित घट झाल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षी जिल्ह्याचा निकाल ९५.५७ टक्के होता.

यंदाच्या परीक्षेसाठी ठाणे जिल्ह्यातून एकूण एक लाख ११ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. त्यापैकी एक लाख पाच हजार ४०८ विद्यार्थी यशस्वी ठरले. जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये ५३ हजार ३६३ मुलांचा, तर ५२ हजार ४५ मुलींचा समावेश आहे. निकालाच्या आकडेवारीत यंदाही मुलींनीच सरस कामगिरी केल्याचे स्पष्ट झाले. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का ९६.३५ राहिला, तर मुलांचा निकाल ९३.८० टक्के नोंदवण्यात आला. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मुलींचे सातत्यपूर्ण वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले होते. निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी आनंद साजरा करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तयारी सुरू केली आहे.

यंदाही मुलींचे प्रमाण सर्वाधिक
ठाणे जिल्ह्यातून यंदाच्या वर्षी एक लाख ११ हजार ३२२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये ५७ हजार १०५ मुले तर, ५४ हजार २१७ मुलींचा समावेश होता. ५७ हजार १०५ मुलांपैकी ५३ हजार ३६३ मुले तर, ५४ हजार २१७ मुलींपैकी ५२ हजार ४५ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे यंदाही मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे.

मिरा-भाईंदर पालिका क्षेत्राचा सर्वाधिक निकाल
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्राचा दहावीचा निकाल ९७.५५ टक्के लागला आहे. मिरा-भाईंदर शहरातून १० हजार २१९ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी नऊ हजार ९६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये पाच हजार १३४ मुलांचा तर, चार हजार ८३५ मुलींचा समावेश आहे.

दहावीचा निकाल (टक्केवारीनुसार)
शहर/तालुका (पालिकानिहाय) उत्तीर्ण मुले उत्तीर्ण मुली एकूण
ठाणे ९३.६० ९६.१२ ९४.८३
नवी मुंबई ९५.२८ ९७.३५ ९६.२७
मिरा-भाईंदर ९६.८१ ९८.३५ ९७.५५
कल्याण-डोंबिवली ९५.६३ ९७.१२ ९६.३५
उल्हासनगर ९०.९९ ९४.७४ ९२.८४
भिवंडी ९०.३० ९५.७३ ९३.११

तालुकानिहाय आकडेवारी (टक्क्यांमध्ये)
कल्याण ८९.९० ९५.०२ ९२.३२
अंबरनाथ ९५.१५ ९६.९६ ९६.०२
भिवंडी ८८.९८ ९२.३१ ९०.५६
मुरबाड ९१.३८ ९४.११ ९२.६९
शहापूर ९२.७३ ९५.५८ ९४.१२
एकूण ९३.८० ९६.३५ ९५.०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

Nagpur Crime : खापरखेड्यात मनोरुग्णाचा पोलिसांवर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; दोघे शिपाई जखमी

SCROLL FOR NEXT