डोंबिवली, ता. ८ : महागड्या दंतचिकित्सेमुळे अनेक सर्वसामान्य नागरिक उपचार घेणे टाळतात. हीच गरज ओळखून कमी दरात आणि आधुनिक सुविधांसह दंतसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘आदी’ या डेंटल उपक्रमाची दुसरी शाखा डोंबिवलीत सुरू करण्यात आली आहे. पश्चिमेतील राहुलनगर येथे शुक्रवारी या शाखेचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी डॉ. दीपा कांबळी, डॉ. श्रीदाय कांबळी, डॉ. सिद्धी भोसले, डॉ. निपुण सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तीन वर्षांपासून कोपर परिसरात सुरू असलेल्या ‘आदी’ या उपक्रमाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आता दुसरी शाखा सुरू केल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमात बोलताना रवींद्र चव्हाण यांनी डॉ. अमेय कांबळी यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले. श्रीदाय लहान असताना त्याची आजी त्याला उद्यानात घेऊन यायची. संघ विचारांच्या त्या आजी नेहमी चांगले संस्कार द्यायच्या. आज त्या संस्कारांतूनच डॉ. कांबळी यांनी डॉक्टर होऊन समाजसेवेचा मार्ग निवडला आहे, ही अभिमानाची बाब आहे. डॉक्टर हे अत्यंत नोबल प्रोफेशन असून कमी दरात दर्जेदार सेवा देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले.
५० टक्के सवलत
क्लिनिकमध्ये नागरिकांना दंतचिकित्सेवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि परवडणारे उपचार येथे मिळणार आहे. आर्थिक अडचणींमुळे उपचार टाळणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे डॉ. श्रीदाय कांबळी यांनी सांगितले.
मोफत कवळीचा उपक्रम
२५ ते २६ वर्षांपासून आम्ही डोंबिवलीत प्रॅक्टिस करत आहोत. समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ‘आदी’ हा उपक्रम सुरू केला. या आधी आम्ही महाराष्ट्रभर मोफत दातांची कवळी बसवण्याचा उपक्रम राबवला होता. शंभरहून अधिक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला. आता क्लिनिकच्या माध्यमातून ही सेवा अधिक व्यापक आणि कायमस्वरूपी स्वरूपात उपलब्ध होणार आहे, असे डॉ. अमेय कांबळी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.