मुंबई

दिघा विभागात अधिकाऱ्यांची कमतरता

CD

दिघा विभागात अधिकाऱ्यांची कमतरता
पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त नसल्याने कामकाज विस्कळित
तुर्भे, ता. ८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या दिघा विभाग कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तुटवडा झाला असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या कामांवर होत आहे. विशेष म्हणजे विभागाला पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त उपलब्ध नसल्याने प्रशासनातील सातत्य खंडित झाले आहे. सध्या या पदाची अतिरिक्त जबाबदारी तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रबोधन मवाडे यांच्याकडे आहे.
गेल्या वर्षभरात तीन सहाय्यक आयुक्तांची नेमणूक होऊनही त्यांच्या बदल्यांमुळे कामकाजात स्थिरता राहिली नाही. अतिक्रमण, घनकचरा व इतर विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. त्यामुळे नागरिक व लोकप्रतिनिधींना वारंवार कार्यालयात जावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
नगरसेविका श्वेता काळे यांनी या समस्येकडे लक्ष वेधत, पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त व आवश्यक कर्मचारी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

चौकट :
निर्णय प्रक्रियेला विलंब
दिघा विभाग कार्यालयात गेल्या वर्षभरात तीन सहाय्यक आयुक्तांची नेमणूक करण्यात आली. मात्र, तिघांच्याही अल्पावधीत बदल्या झाल्याने विभागात प्रशासकीय सातत्य राहिले नाही. परिणामी महत्त्वाच्या निर्णयप्रक्रियेला विलंब होत असून, विविध कामांवर परिणाम होत आहे. सध्या प्रभारी पद्धतीने कामकाज सुरू असल्याने स्थानिक समस्यांवर तातडीने निर्णय घेणे कठीण ठरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत असून, विभागाला कायमस्वरूपी, पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त नेमण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

IndiGo Cabs : इंडिगोची कॅब सर्व्हिस सुरू! एअरपोर्ट पिकअप-ड्रॉप फक्त 49 रुपयांमध्ये, कसं बुक करायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : सोयगावच्या जरंडी परिसरात दीड तास ढगफुटी सदृश्य पाऊस; नदी- नाल्यांना पूर

SCROLL FOR NEXT