मुंबई

सहा तासांत दीड कोटींच्या चोरीचा उलगडा

CD

पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत दीड कोटींच्या चोरीचा उलगडा करत तीन संशयितांना अटक केली आहे. तसेच चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. कंपनीत पर्यवेक्षक म्हणून कामाला असलेला विजयकुमार बाबूलाल वर्मा यानेच इतर संशयितांना चोरी करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे व चोरीच्या बदल्यात त्याने त्यांच्याकडून १० लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दहा लाखांची रक्कमसुद्धा जप्त केली आहे.

टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीने रेल्वे पुलाच्या बांधकामाचे कंत्राट घेतले असून त्यासाठी लागणारे साहित्य कंपनीने पनवेल येथील करंजाडे सेक्टर एकमधील रेल्वेच्या जागेत ठेवले होते. याच ठिकाणावरून चोरट्यांनी २८ एप्रिलला दीड कोटींचे साहित्य चोरून नेले होते. याबाबत पनवेल शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विशेष पथके तयार केली. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि स्थानिक पातळीवरील चौकशीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या सहा तासांत तीन संशयितांना अटक केली. तसेच चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केला. या प्रकरणातील मुख्य संशयित विजयकुमार हा संबंधित कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. त्यानेच अन्य आरोपींना चोरी करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे तसेच चोरीच्या बदल्यात त्याने आरोपींकडून १० लाख रुपये घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT