मुंबई

रोखपालानेच मारला बँकेतील लाखोंवर डल्ला

CD

पनवेल, ता. ८ (वार्ताहर) : शहरामधील जी. एस. महानगर सहकारी बँकेत कामाला असलेल्या रोखपालनेच ग्राहकांनी बँकेत विश्वासाने ठेवलेल्या तब्बल १५ लाख ४९ हजारांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याने ही रक्कम शेअर मार्केटमध्ये लावल्याचे कबूल केले आहे. बँकेने दिलेल्या तक्रारीनुसार पनवेल शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

विकास किसन कदम हा टपाल नाका, मिरची गल्ली भागात असलेल्या जी. एस. महानगर सहकारी बँकेत रोखपाल म्हणून काम करीत होता. मार्चमध्ये त्याची या शाखेत बदली झाली होती. त्यानंतर त्याने २८ एप्रिल ते २ मे या कालावधीत लोकांनी विश्वासाने बँकेकडे सोपवलेली तब्बल १५ लाख ४९ हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली. गेल्या आठवड्यात मुख्य कार्यालयातील अधिकारी पनवेल शाखेत जमा असलेली रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी कॅश व्हॅन घेऊन आले होते. त्या वेळी बँकेत जमा असलेल्या रकमेत पैसे कमी असल्याचे आढळून आले. त्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकांनी याबाबत लेखापालाकडे चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर बँकेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने बँकेतील रकमेचा अपहार केल्याचे तसेच ही रक्कम त्याने भांडवली बाजारामध्ये लावल्याचे कबूल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT