मुंबई

छत्रपतींच्या पुतळ्यावरून राजकारण तापले

CD

छत्रपतींच्या पुतळ्यावरून राजकारण तापले
तब्बल अडीच वर्षांनी दुरुस्तीचा निर्णय
भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : काशी मिरा नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र, हा पुतळा स्थलांतरित केला जाणार असल्याचा आरोप होत आहे.
त्यामुळे मिरा-भाईंदरचे राजकारण चांगलेच तापले आहे. छत्रपतींचा पुतळा उभारून ३० वर्षांचा कालावधी लोटल्याने पालिकेच्या संरक्षणात्मक परिक्षणात पुतळ्याच्या तातडीने दुरुस्ती करण्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी २०२२ मध्येच पुतळा स्थलांतरित करण्यात यावा, असे निर्देश महपालिकेला दिले होते. या ठिकाणी मेट्रो जात असल्याने पुतळ्याच्या आजूबाजूचे रस्ते उंच झाले आहेत. मात्र, अडीच वर्षांच्या प्रशासकीय काळात त्यावर कोणतीही हालचाल झाली नाही. बुधवारी (ता. ६) झालेल्या महासभेत प्रशासनाने पुतळ्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव दिला. त्यावर सत्ताधारी भाजपने पुतळ्याची तातडीने दुरुस्ती करण्यात करावी, असा निर्णय घेतला, पण विरोधकांनी पुतळ्याच्या स्थलांतराला विरोध केला आहे, तर विविध संघटना, राजकीय पक्षांकडूनही आंदोलनाची भाषा केली जात आहे. त्यामुळे शहरातले वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
०००००००००००००००००००००००००००
उपमहापौरांचे स्पष्टीकरण
शहरात पाणी समस्या, अनधिकृत फेरीवाले, वाहतूक कोंडी अशा विविध ज्वलंत विषय भेडसावताना कोणतीही आंदोलने होत नाहीत. छत्रपतींच्या पुतळ्यावरून राजकारणावरून सामान्य नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे केवळ पुतळ्याच्या दुरुस्तीचा निर्णय झाला असून, पुतळा स्थलांतराबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

Forest Plantation: पुणे वनवृत्तात ४०८ हेक्टरवर ३० लाख रोपे; वनमहोत्सव २०२६ साठी वन विभाग सज्ज

Fake Cosmetics Sale : पुण्यात बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री; औषध विक्रेत्यासह वितरकावर गुन्हा

SCROLL FOR NEXT