मुंबई

विद्याभवन शाळेची १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम

CD

विद्याभवन शाळेची १०० टक्के निकालाची उज्ज्वल कायम

मुंबई, ता. ८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत पुणे विद्यार्थी गृह संचलित विद्याभवन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घाटकोपर (सेमी इंग्रजी माध्यम) येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेची १०० टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.

यंदा प्रशालेतील एकूण १५० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत. तसेच ७१ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी, ६१ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर आठ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे. प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अथर्व दीपक नारायणकर यांनी ४८०/५०० गुण (९६ टक्के) मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. सावरी सचिन सहाणे यांनी ४६०/५०० गुण (९२ टक्के) मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला, तर नयन प्रकाश लोलगे आणि आयुष भिवा बोंडगे यांनी प्रत्येकी ४५९/५०० गुण (९१.८० टक्के) मिळवत संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक संपादन केला असून, या विद्यार्थ्यांचे संस्थेकडून मोठे कौतुक करण्यात आले. या उल्लेखनीय यशाबद्दल पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बोऱ्हाडे, मुख्याध्यापिका योगिनी पोतदार, उपमुख्याध्यापिका ज्योती देसाई यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

Monsoon Update: मान्सूनचा वेग मंदावला! देशातल्या १२ राज्यांतील ३१५ जिल्ह्यांवर दुष्काळाचे भीषण सावट

Tankerman Salman Pathan : गावचा पाणी पुरवठा झाला कमी; अगरवाडगावची तहान भागवतोय ‘टँकरमॅन’ सलमान

SCROLL FOR NEXT