भिवंडी, ता. ८ (वार्ताहर) : शैक्षणिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिल्या जाणाऱ्या दहावी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेमध्ये भिवंडी शहरातील ६५ शाळांमधील दहावी परीक्षेस बसलेल्या ५,५१४ विद्यार्थ्यांपैकी ५,४९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, तालुका ग्रामीणचा एकूण निकाल ९०.५६ टक्के लागला आहे. यामध्ये १५ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. बी. ए. राऊत विद्यालय पाच्छापूर, खंबाळा विभाग हायस्कूल खंबाळा, माध्यमिक विद्यालय नांदकर सांगे, शिव खांडेश्वरी विद्यामंदिर लोनाड, अल उम्मत इंग्लिश हायस्कूल, टी. ए. पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल पडघा, टी. ए. पाटील गुरुकुल सेमी इंग्लिश मीडियम हायस्कूल पडघा, डीवाईन इंग्लिश मीडियम हायस्कूल, आर. के. पालवी विद्यामंदिर, विवेकानंद पब्लिक स्कूल, पडघा उर्दू हायस्कूल, संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल अंजूर, ओम साई इंग्लिश मीडियम हायस्कूल, के. आर. मालदे इंग्लिश मीडियम हायस्कूल, देविका इंग्लिश मीडियम हायस्कूल काल्हेर या शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे, तर तालुक्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये एकूण उत्तीर्ण ५,४९२ विद्यार्थ्यांपैकी ९६२ उच्च श्रेणीत, १६११ प्रथम श्रेणीत, १६५६ द्वितीय श्रेणीत, तर ७९५ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण श्रेणीत यश मिळवले आहे.
‘संस्कार’चा दहाव्यांदा १०० टक्के निकाल
ज्ञानज्योत समाज प्रबोधन मंडळाच्या अंजुर येथील संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलने सलग दहाव्या वर्षी १०० टक्के निकालाची अखंड परंपरा कायम ठेवली आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत संस्कृती संदीप पाटील ही ९५ टक्के गुणांसह प्रथम आली असून, संस्थेचे अध्यक्ष राम माळी यांच्यासह सर्व संचालक मंडळाने तिचे अभिनंदन केले आहे. अंजूर, भरोडी, अलिमघर, सुरई, सारंगगाव, वेहेळे, भाटाळे, माणकोली, अंजूरदिवे या ९ गावांतील तरुणांनी एकत्र येऊन संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली होती. या शाळेत अल्प शुल्कामध्ये इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण दिले जाते. शाळेचे मुख्याध्यापक संदेश पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.