हॅपी होम अंध शाळेचा निकाल १०० टक्के
मुंबई, ता. ८ : राज्य शिक्षण मंडळाच्या फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत मुंबईतील हॅपी होम अंध शाळेतून पाच अंध (दिव्यांग) विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून, या शाळेचा एकूण निकाल १०० टक्के इतका लागला आहे. या शाळेतून पहिले पाचही विद्यार्थी प्रथम श्रेणी उत्तीर्ण झाले असून, त्यांना ९० टक्के गुण प्राप्त झाले, तर इतर चारही विद्यार्थी ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्याने शाळेकडून या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
दहावीत अनोखे यश संपादन करणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांमध्ये उमेर शेख या विद्यार्थ्यांने तब्बल ९० टक्के गुण मिळवले आहेत. विशेष म्हणजे उमेर हा हॅपी होम अंध शाळेत गेल्या दहा वर्षांपासून शिकत आहे. त्याचे मामा व आजी हे दृष्टीबाधित आहेत. त्याचे मामा याच शाळेचे विद्यार्थी होते. उमेर हा सुस्वभावी, नम्र व हुशार विद्यार्थी आहे. तसेच अभ्यासाव्यतिरिक्त तो क्रीडा, हस्तकला, मोजेक व कार्पेन्टरी या कार्यातही अग्रक्रमाने भाग घेतो.
दुसऱ्या विद्यार्थ्यांमध्ये इस्माईल शेखने ८७.८० टक्के, ओम राऊतने ८२.८० टक्के, इब्राहिम हुसेन या विद्यार्थ्याने ८०.८० टक्के आणि शाह आलम खान याने ८०.८० टक्के गुण मिळवले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.