

IRFAN PATHAN BACKS VAIBHAV FOR TEAM INDIA
esakal
- वर्षा बळहे
IRFAN PATHAN BACKS VAIBHAV FOR TEAM INDIA: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) १९ वा हंगाम सुरू आहे. आयपीएलमध्ये प्रत्येक वर्षी अनेक नवीन खेळाडू समोर येत असतात. या वर्षीदेखील असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे राजस्थान रॉयल्सचा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi). वैभवने अवघ्या १५ व्या वर्षी आपल्या खेळातून अनेक मोठमोठ्या खेळाडूंना मागे टाकलं आहे. या हंगामात वैभवने अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. त्यामुळे वैभवला भारतीय संघात जागा मिळायला पाहिजे, यावर अनेक माजी खेळाडूंनी आपलं मत व्यक्त केलं आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने देखील वैभवच्या भारतीय संघात समावेशाची मागणी केली आहे.