सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ : डोंबिवलीमधील विद्यानिकेतन शाळेने दहावीच्या परीक्षेत यंदाही घवघवीत यश संपादन करत सलग अठराव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदाच्या निकालात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्ता सिद्ध करत अनेकांनी उल्लेखनीय गुण मिळवले.
विशेष म्हणजे, शाळेतील प्रथम तीन क्रमांक हे ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ पद्धतीनुसार नव्हे, तर विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लेखी व मौखिक परीक्षेत मिळवलेल्या एकूण गुणांच्या आधारे जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थाचालक विवेक पंडित यांनी दिली. यामध्ये तन्मय पोफळे याने ९६.५० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. श्लोक वाकणकर याने ९६ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर निहारिका प्रभुदेसाई हिने ९५.८३ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला.
यंदा परीक्षेला एकूण १६३ विद्यार्थी बसले होते आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाच्या गुणवत्तेचा विचार करता, ९० ते ९९ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ४२ इतकी आहे. तसेच ८१ ते ९० टक्के गुण मिळवणारे ६८ विद्यार्थी असून, ७१ ते ८० टक्के गुण मिळवणाऱ्या ४० विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवले. ५० ते ७० टक्के गुणांच्या श्रेणीत १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि पालकांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.