मुंबई

कळव्यात चौघांवर भूमाफियांचा चाकू हल्ला!

CD

कळव्यात चौघांवर चाकू हल्ला
भीमनगर परिसरातील घटना; एकाला अटक

कळवा, ता. ८ (बातमीदार) ः पक्के घर बांधून देण्याच्या बहाण्याने पाच लाख रुपये घेतले; मात्र काम न करता जीवे मारण्याची धमकी देत खोल्या खाली करण्यासाठी एका कुटुंबातील तिघांवर व शेजाऱ्यावर चाकू हल्ल्याची घटना कळव्यातील भीमनगर परिसरात शुक्रवारी (ता. ८) घडली. जखमींवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर कळवा पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळव्यातील भीमनगर झोपडपट्टीत राहणारे सूरज विश्वकर्मा, सीतादेवी विश्वकर्मा, सोनाली विश्वकर्मा हे कुटुंब व त्यांच्या शेजारी पूनम तिवारी हे पत्र्याच्या कच्च्या झोपडीत राहतात. तीन वर्षांपूर्वी परिसरात झोपड्या उभारणारा जयप्रकाश बिंद यांनी या कुटुंबाला पक्के घर बांधून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले; मात्र काम न करता त्या जागेवर भाड्याने इतर व्यक्तींना ठेवले. ती खोली खाली करण्यासाठी सांगितले असता जयप्रकाश बिंद, राज बिंद व कृष्णा बिंद यांनी शुक्रवारी सकाळी घरात शिरून खोल्या खाली करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देत चाकूने हल्ला केला. यात पूनम तिवारी (वय ३२) हिच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. तर सोनाली विश्वकर्मा (२४) हिच्या गळ्याजवळ, गालावर चाकूने वार करण्यात आला. तर सूरज विश्वकर्मा (५८) व सीतादेवी विश्वकर्मा (४८) यांच्या पाठीवर व हातावर चाकूने वार करण्यात आले आहेत. हल्ल्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. शेजाऱ्यांच्या मदतीने जखमींना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळवा पोलिसांनी बिंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर राज बिंद याला अटक केली असून दोन फरारींचा शोध सुरू आहे. यातील मुख्य आरोपी जयप्रकाश बिंद याच्यावर याआधी बेकायदा खोल्या बांधणे, जमीन हडप करणे आदी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी काहीकाळ त्याला तडीपारही केले होते.

दोन्ही कुटुंबांवर गुन्हे
कळवा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी गुरुवारी तिघा फिर्यादी महिलांनी पारसिकनगरजवळ आरोपी बिंद याला मारहाण केल्याची तक्रार कळवा पोलिसांत दाखल केली आहे. यासंदर्भात कळवा पोलिस अधिक तपास करीत असून दोन्ही कुटुंबावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT