बेस्ट आगारांखाली पार्किंग सुविधा उपलब्ध करा!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः बेस्ट आगारांच्या भूखंडाच्या खाली तळघर बनवून त्यात पार्किंग सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी नगरसेवक दीपक कोतेकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. पालिका आयुक्तांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चाचपणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुंबई शहरातील आणि मुंबई शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या प्रमाणात वाहने उभी करण्यासाठी उपलब्ध जागा अगदीच अपुरी आहे. परिणामी, वाहनचालक मिळेल त्या जागी वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नियोजनबद्धरीत्या वाहने उभी करण्यासाठी अधिकाधिक जागा उपलब्ध करण्याचा पर्याय शोधणे ही काळाची गरज असल्याचे मत नगरसेवक व्यक्त करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.