भिवंडी, ता. १० (बातमीदार) : भिवंडी महापालिका क्षेत्रात नव्याने सिटी बस सुरू होणार असल्याने मुख्य मार्गावर रस्ता रुंदीकरण करून एमएमआरडीएच्या माध्यमातून सिमेंटचे रस्ते झाले आहेत. शहराचा विकास होत असताना मात्र स्थानिक रिक्षाचालक-मालक संघटनांनी स्वयंघोषित थांबे तयार करून मनमानी भाडे आकारत आहेत. या सर्व प्रकारची गंभीर दाखल घेऊन ठाणे प्रादेशिक परिवहन विभागा(आरटीओ)ने शहरातील नागरिकांची होणारी लूट थांबवून मीटरने रिक्षा सुरू करावी, अशी मागणी स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे.
भिवंडी शहर आणि परिसरात सुमारे १५ हजारहून अधिक ऑटोरिक्षा आहेत. त्यापैकी ८० टक्के रिक्षाचालक अनिवासी आहेत. शहरात आणि परिसरात अंजूर फाटा, भिवंडी रोड रेल्वे स्थानक, कामतघर, मानसरोवर, राजनोली नाका, भंडारी कम्पाउंड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नदीनाका, भादवड, चावींद्रा, वंजारपटीनाका, साईबाबा मंदिर इत्यादींसाठी रिक्षाचालक नियमांपेक्षा जास्त अवाजवी भाडे आकारतात. तसेच रिक्षाचालकांनी स्वयंघोषित केलेल्या थांब्यासाठी शेअर रिक्षा चालवून प्रत्येक थांब्यासाठी १५ रुपये घेतात.
मीटर सुरू करणे आणि शहरात रिक्षांसाठी नव्याने थांबे तयार करून त्यास मान्यता देणे, हे काम ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने केले जाते. त्यासाठी त्यांनी भिवंडीत येणे आवश्यक आहे. स्थानिक वाहतूक पोलिस वाहतूक नियमानुसार वाहनांवर नियंत्रण करतात. तसेच दैनंदिन वाहतूक समस्येला सामोरे जाताना अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कारवाईला मर्यादा येतात, अशी माहिती भिवंडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पाेलिस आयुक्त शरद ओहोळ यांनी दिली.
बहुतांशी रिक्षाचालक परप्रांतीय
या शहरात बहुतांशी रिक्षाचालक परप्रांतातून येऊन येथे स्थायिक झाले आहेत. येथे १५-२० वर्षे स्थायिक राहून शिक्षण कमी असलेले ८० टक्के रिक्षाचालक मराठी बोलण्यास विरोध करीत आहेत. रिक्षाचालक आणि सामान्य प्रवासी दोघांनी मराठी बोलले तर येथील मराठी भाषेला प्राधान्य मिळणार आहे. मराठी येत नसल्याने परप्रांतीय नागरिक अनेक सरकारी कामासाठी दलालचा उपयोग करतात. केवळ शहरातील केवळ २० टक्के रिक्षाचालक मराठी आहेत आणि ८० टक्के रिक्षाचालक इतर भाषा बोलतात. त्यांच्यासाठी विशेष उपक्रम सत्ताधाऱ्यांनी घेतला पाहिजे, अशी मागणी मराठीप्रेमी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.