मुंबई

महाऑनलाइन पोर्टलचा खोळंबा

CD

महाऑनलाइन पोर्टलचा खोळंबा
दाखले मिळवण्यास नागरिकांची गैरसोय

जव्हार, ता. ८ (बातमीदार) : जव्हार तालुक्यात शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले महसूल विभागाचे दाखले मिळवताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाऑनलाइन सेवा पोर्टलमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे अर्ज प्रक्रिया ठप्प होत असून, नागरिकांसह सेवा केंद्र चालक त्रस्त झाले आहेत.

तांत्रिक कारणामुळे तब्बल नऊ दिवस बंद असलेले महाऑनलाइन पोर्टल रविवारी (ता. ३) पुन्हा सुरू करण्यात आले होते. त्यामुळे महाआयटी टीम तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र, दोन ते तीन दिवसांतच पोर्टलमध्ये पुन्हा तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महाआयटीकडून नवीन युआरएल (लिंक) देण्यात आली, परंतु त्यावरही काम होत नसल्याची तक्रार केंद्र चालकांनी केली आहे. अर्ज दाखल करताना कागदपत्रे अपलोड न होणे, ग्राहकांचे फोटो अपलोड न होणे, संकेतस्थळ अत्यंत संथ गतीने चालणे, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज पुन्हा होमपेजवर येणे अशा विविध समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागला. गुरुवारी (ता. ७) तर पोर्टलवर लॉगइनही होत नसल्याने सेवा केंद्र चालकांची मोठी गैरसोय झाली.

महसूल विभागाकडून मिळणारी विविध शासकीय प्रमाणपत्रे आपले सरकार सेवा केंद्र, सेतू केंद्र आणि महाऑनलाइन सेवा केंद्रांच्या माध्यमातून वितरित केली जातात. नागरिकांना सुविधा मिळावी म्हणून ग्रामीण भागातही या केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. मात्र, पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याची भावना केंद्र चालकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, संकेतस्थळ तातडीने सुरळीत सुरू करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी सेवा केंद्र चालकांकडून करण्यात येत आहे.

--------------
ग्राहकांसह केंद्रचालकांना फटका
महाऑनलाइनचे पोर्टल नेहमी तांत्रिक बिघाड होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अनेक वेळा केंद्रचालक आणि ग्राहकांमध्ये वाद निर्माण होतात. वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केल्या जात आहे. महाऑनलाइनची सेवा सतत विस्कळित होत असल्यामुळे ग्राहकांसह केंद्रचालाकांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे.
----------
मला माझ्या शैक्षणिक कामानिमित्त काही प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. त्यासाठी मी जव्हार येथील एका महा ई-सेवा केंद्रात ती मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. मात्र, त्या वेबसाईटला तांत्रिक बिघाडचे कारण सांगितले जात आहे. यामुळे मी गेल्या बारा दिवसांपासून फेऱ्या मारत आहे. मात्र, माझे काम अद्याप झालेले नाही.
-शैला बाबू पारधी, विद्यार्थिनी, आकरे (धांगडपाडा)

---------------
नागरिकांना कागदपत्र मिळण्याकरिता महसूल कार्यालय पूर्णपणे तयार आहे. मात्र, आपले सरकार सेवा या पोर्टलवर काही तांत्रिक बिघाड येत असल्यामुळे दाखले अप्रूव्ह करताना अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या आहेत.

- भाऊसाहेब फटांगरे, अपर जिल्हाधिकारी, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT