मुंबई

शासकीय कार्यालयात नागरिकांची पाण्यासाठी वणवण

CD

ठाणे शहर, ता. ८ (बातमीदार) : मध्यवर्ती कारागृहासमोरील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयात येणाऱ्या नागरिकांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नवीन वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण अशी अनेक प्रकारची कामे येथे केली जातात. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात येथे ये-जा असते. बंद पडलेली स्वच्छ पाण्याची सुविधा पूर्ववत करण्याऐवजी प्रशासनाकडून सुलभ शौचालयाच्या शेजारी पाण्याची टाकी उभी करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार केला जात आहे.

ठाणे मध्यवर्ती कारागृहासमोर प्रादेशिक परिवहनचे कार्यालय आहे. येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांपासून इतर कनिष्ठ अधिकारी, कर्मचारी बसतात. दुचाकीपासून जड अवजड वाहनांपर्यंतची अनेक प्रकारची कामे येथे केली जातात. त्यामुळे रोज हजारो वाहनचालक येथे येतात. असे असताना येथे त्यांच्याकरिता शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असून, त्यांना पाण्याची शोधाशोध करावी लागत आहे. २०१० मध्ये येथे शुद्ध आणि थंडगार पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरु करण्यात आली होती. मात्र, ती गेल्या अनेक वर्षांपासून बंद असून, पाणपोईमधील सर्व यंत्रणा भंगारावस्थेत आहे. ही पाणपोई सुरू करण्याऐवजी प्रशासनाने सुलभ शौचालयाच्या भिंतीला लागून पाण्याची टाकी उभी केली असून, नागरिकांवर तेथे पाणी पिण्याची वेळ आली आहे. शिवाय नळाचे पाणी परिसरात पसरत असल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे.

शुद्ध पाण्याची पाणपोई बंद करून शौचालयाच्या बाजूला पाण्याची सुविधा करण्याचा अजब प्रकार करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT