‘त्या’ अधिकाऱ्याला सोमवारपर्यंत कोठडी
ठाणे, ता. ८ ः लैंगिक अत्याचारप्रकरणी ठाणे महापालिकेचा माजी अधिकारी महेश आहेर याला ठाणे न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कोल्हापूर पोलिसांकडून त्यांचा ताबा घेऊन शुक्रवारी (ता. ८) पहाटे त्याला अटक करण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली.
एप्रिल महिन्यात कासारवडवली पोलिस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर आहेर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंद झाल्यानंतर आहेर फरार झाला होता. त्याचा शोध घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाच्या पथकाकडून विविध ठिकाणी तपास सुरू होता. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी राबवलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान महेश आहेर याला ताब्यात घेतले. याबाबत माहिती मिळताच ठाणे पोलिसांचे पथक कोल्हापूरला रवाना झाले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला ठाणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शुक्रवारी पहाटे त्याला ठाण्यात आणण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (ता. ११) पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात आणखी काही बाबी समोर येतात का, यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.