मुंबई

अखेर शिवसेनेने गड काबीज केला

CD

अंबरनाथ, ता. ८ (वार्ताहर) : अंबरनाथ नगरपालिकेतील बहुचर्चित गट वैधतेच्या राजकीय संघर्षात शिवसेना अंबरनाथ महायुती आघाडी गटाला जिल्हाधिकाऱ्यांनी वैध ठरवल्यानंतर शहरात शुक्रवारी शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फटाक्यांची आतषबाजी, पेढेवाटप आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ७ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार महायुती आघाडी गटाचे ३२ सदस्यीय संख्याबळ कायम ठेवून त्याला मान्यता दिली. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी सचिन पाटील यांना स्वीकृत नगरसेविका म्हणून मान्यता मिळाली आहे. निकाल जाहीर होताच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, शिवसेनेचे गटनेते रवींद्र करंजुळे-पाटील, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अब्दुल शेख, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी रवींद्र करंजुळे यांनी भाजपवर टीका करत, अखेर शिवसेनेने अंबरनाथचा गड काबीज करत सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या आहेत, असे म्हटले. २५ वर्षांपासून अंबरनाथ पालिकेत शिवसेनेची सत्ता अबाधित असल्याचा दावा करत त्यांनी, नगराध्यक्ष शिवसेनेचा नसला तरी सर्वाधिक नगरसेवक आमचे आहेत. आम्ही संख्याबळाचा गैरवापर करणार नाही; मात्र विकासाच्या मुद्द्यावर ताकदीने काम करू, असे स्पष्ट केले. तसेच स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपचे तीन आणि शिवसेनेचे दोन नगरसेवक स्वीकृत म्हणून घोषित करताना संख्याबळाचा विचार न करता घाईघाईत सभा संपवण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. तसेच या विजयाचे श्रेय गटनेते रवींद्र पाटील यांना देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचे आभार मानले.

विरोधकांवर उपरोधिक टोला
उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनीही विरोधकांवर उपरोधिक टोला लगावला. सदामामा कधी क्रिकेट खेळले नसले तरी पाकिस्तान आणि हिंदुस्थानची मॅच नक्की पाहिली, असे म्हणत त्यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले.

बहुतांश समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व?
अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक डिसेंबर २०२५ मध्ये पार पडली होती. त्यानंतर पालिकेतील सत्ता समीकरणांवरून राजकीय हालचालींना वेग आला होता. या राजकीय घडामोडींमुळे विशेष समित्या आणि सभापतिपदांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, गट वैधतेचा निकाल लागल्यानंतर या निवडणुका लवकरच पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालिकेतील सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती आल्याने बहुतांश समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व राहण्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Playoff Race: राजस्थान की गुजरात? आज जो जिंकेल तो थेट अव्वल दोनमध्ये झेप घेणार; पाहा प्लेऑफचं नवं समीकरण

Monsoon Update Weather Expert : जूनच्या पहिल्याच आठवड्यात मॉन्सून भारतात, हवामान तज्ज्ञांचा अंदाज; भारतीय उपखंडाकडे सरकण्याच्या प्रक्रियेला गती

Vidarbha News: सिहोरा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर; उभे धान पिक जमिनदोस्त; सिंदपुरी, मोहाडी खापा, मुरली, सोनेगांव इत्यादी गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Nagpur News: रेशीमबाग मैदान धावपटूंसाठी बंद!; प्रशासनाने सर्व गेटला कुलूप लावल्याने खेळाडू सरावापासून वंचित

Latest Marathi News Live Update : हैदराबादमध्ये ‘आयपीएस’च्या पत्नीची हत्या

SCROLL FOR NEXT