बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग
३४९ किमी व्हायाडक्ट पूर्ण; बोगद्याचे काम प्रगतिपथावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : देशातील महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने पुढे सरकत असून ५०८ किलोमीटरपैकी ३४९ किलोमीटर व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ४४३ किलोमीटरपर्यंत पिलर उभारणीचे काम पूर्ण झाल्याची माहिती राष्ट्रीय हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनने दिली.
प्रकल्पांतर्गत आतापर्यंत १७ नदी पूल, पाच प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट (पीएससी) पूल आणि १३ स्टील पूल पूर्ण झाले आहेत. ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी २८८ किलोमीटर मार्गावर सुमारे ५.७ लाख नॉईज बॅरिअर्स बसविण्यात आले आहेत. रेल्वे ट्रॅकच्या कामालाही वेग आला असून १८७ रूट किलोमीटर, म्हणजेच ३७४ ट्रॅक किलोमीटर आरसी ट्रॅक बेडचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १९१ रूट किलोमीटरसाठी ट्रॅक स्लॅब तयार करण्यात आले असून ७४ रूट किलोमीटरपर्यंत ट्रॅक स्लॅब बसवून सिमेंट ॲस्फाल्ट मोर्टार इंजेक्शनचे कामही पूर्ण झाले आहे. गुजरातमधील एकमेव पर्वतीय बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, तर महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील सात पर्वतीय बोगद्यांपैकी दोन बोगद्यांचे ‘ब्रेकथ्रू’ यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहेत.
...
बोगद्याच्या कामाला गती
मुंबईतील बीकेसी ते शिळफाट्यादरम्यानच्या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी पाच किलोमीटर बोगद्याचे उत्खनन पूर्ण झाले आहे. उर्वरित १६ किलोमीटर बोगदा टनेल बोरिंग मशीनद्वारे (टीबीएम) खोदण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या दोन टीबीएमचे सर्व भाग महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. विक्रोळी आणि सावली येथे या यंत्रांची जोडणी तसेच भूमिगत उतरविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
...
स्थानकांची कामे अंतिम टप्प्यात
वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, आनंद-नडियाद, वडोदरा, अहमदाबाद आणि साबरमती या आठही बुलेट ट्रेन स्थानकांचे पाया बांधकाम पूर्ण झाले असून सुपर स्ट्रक्चरचे काम प्रगत टप्प्यात पोहोचले आहे. यापैकी सात स्थानकांवर अंतर्गत आणि फिनिशिंगची कामे सुरू आहेत. महाराष्ट्रातील तिन्ही उन्नत स्थानकांचे कामही सुरू झाले असून मुंबईतील भूमिगत स्थानकावर स्लॅब कास्टिंगचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.