मुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष टपाल तिकीट जारी होणार!

CD

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष टपाल तिकीट जारी होणार

चेंबूर, ता. ११ (बातमीदार) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी करून भारतीय टपाल विभागाकडून अनोखी आदरांजली वाहिली जाणार आहे. यासंदर्भात, शिवसेना सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या मागणीची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली असून, लवकरच यावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

या मागणीबाबत केंद्र सरकारकडून नुकतेच एक पत्र प्राप्त झाल्याची माहिती शेवाळे यांच्याकडून देण्यात आली. भारतीय टपाल विभागातील उप महासंचालक कार्यालयाकडून शेवाळे यांना प्राप्त झालेल्या पत्रात लिहिले आहे, की फिलाटेल (संग्रह) विभागाच्या सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्याबाबत चर्चा करण्यात येईल. त्यामुळे लवकरच अशा प्रकारचे तिकीट जारी केले जाण्याची शक्यता आहे.

या वर्षी बाळासाहेब ठाकरे यांची १००वी जयंती देशभरात मोठ्या आनंदाने साजरी करण्यात आली. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने बाळासाहेबांना अनोखी श्रद्धांजली द्यावी, ही देशभरातील लाखो चाहत्यांची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारने विशेष टपाल तिकीट जारी करून यथोचित सन्मान करावा, याबाबत राहुल शेवाळे यांनी दळणवळणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना लेखी निवेदन दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! पुनर्विकासात आता फक्त घरे नाहीत; पायाभूत सुविधांनाही प्राधान्य मिळणार

Latest Marathi News Live Update: उद्योग व वाणिज्य आणि गुंतवणूक प्रोत्साहन या विभागांची खाती अमन अरोरा यांना सोपवण्यात आली

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

Water Supply Scheme : पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्यासाठी फुरसुंगी नगरपरिषदेला महापालिकेचे पत्र

Mumbai Water Supply: मुंबईकरांनो सावधान! १५ मेपासून पाणीपुरवठ्यात कपात; बीएमसीचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT