मुंबई

सेंट मॅथिवज शाळेचा सलग १६ व्या वर्षी शंभर टक्के निकाल

CD

सेंट मॅथ्यूज शाळेचा सलग १६व्या वर्षी शंभर टक्के निकाल

मालाड, ता. १० (बातमीदार) : मालाड पश्चिमेतील मालवणी परिसरातील आझमीनगर येथील सेंट मॅथ्यूज शाळेने यंदाही दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा सलग १६व्या वर्षी दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.

मालवणीच्या एका कोपऱ्यात कार्यरत असलेल्या या शाळेत परिसरातील गरीब, गरजू आणि वंचित घटकांतील विद्यार्थी शिक्षण घेतात. कमी फी, अधिक शैक्षणिक सुविधा आणि विशेष शिकवणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी तयार केले जाते. त्याचेच फलित म्हणून शाळेचा निकाल सातत्याने उत्कृष्ट लागत असल्याचे दिसून येत आहे. यंदा सोनम पाईकराव हिने ९६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. इकरा सलीम खान हिने ९५.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर तिसऱ्या क्रमांकावर ९५ टक्के गुणांसह विद्यार्थिनीने स्थान मिळवले. पहिल्या १२ गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आठ मुली आणि चार मुलांचा समावेश आहे.

यावर्षी शाळेतील ११२ विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षा दिली होती आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यापैकी ६६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य (डिस्टिंक्शन) मिळवले, तर बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली. या भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे, हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी शाळेकडून सर्वतोपरी मदत केली जाते. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक यांचा या यशामध्ये मोठा वाटा आहे. या मागासलेल्या वस्तीतून अनेक विद्यार्थी आज यशस्वी आणि कर्तृत्ववान नागरिक बनले आहेत, असे मुख्याध्यापिका लार्जी व्हर्गिस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Second Setback : हसन मुश्रीफांना सलग दुसरा राजकीय धक्का! जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंचा जातीचा दाखला अवैध

सोने-चांदीच्या भावात विक्रमी घसरण, ३ वर्षांची वाढ झाली कमी; जाणून घ्या आज किती भाव

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Pune Trekking : ट्रेकर्ससाठी महत्त्वाचा इशारा! पर्यटकांनो साहस करा; पण जपून, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना काळजी घेण्याचे आवाहन

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इतरांना धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT