मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. १०) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर, तर ठाणे ते वाशी अप आणि डाऊन ट्रान्सहार्बरवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंग्यादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर त्या अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
ट्रान्सहार्बर मार्ग
कुठे : ठाणे ते वाशी, नेरूळ अप-डाऊन मार्ग
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी, नेरूळदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर लोकल सेवा पूर्णपणे रद्द राहतील. तसेच ठाण्याहून वाशी, नेरूळ, पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ या वेळेत रद्द राहतील. पनवेल, नेरूळ, वाशीहून ठाण्याकडे येणाऱ्या काही सेवा सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ पर्यंत रद्द राहतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.