मुंबई

तदर्थ समित्यांच्या बैठका रखडल्या

CD

तदर्थ समित्यांच्या बैठका रखडल्या
नगरसेवक अनिकेत म्हात्रे आक्रमक
वाशी, ता. ८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थापन करण्यात आलेल्या विविध तदर्थ समित्यांच्या बैठका अद्यापही न झाल्याने नगरसेवक तथा युवासेना जिल्हाप्रमुख अनिकेत रमाकांत म्हात्रे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका सचिवांना पत्र पाठवत प्रशासनाला जाब विचारला आहे.
महासभेत नगररचना, आरोग्य, अभियांत्रिकी विभाग तसेच प्रशासकीय काळातील कामांच्या चौकशीसाठी विशेष तदर्थ समित्या गठित करण्यात आल्या होत्या. याशिवाय महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ३२ अंतर्गत ५ सदस्यीय “महापालिका कामकाज पूरक तदर्थ समिती” नियुक्त करण्यात आली होती. महापौरांच्या आदेशानुसार विविध महत्त्वाचे ठराव अभिप्रायासाठी या समित्यांकडे पाठवले जातात.
मात्र, समित्यांची स्थापना होऊन ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही एकही बैठक न झाल्याने अनेक विकासकामे आणि ठराव प्रलंबित राहिल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. यामुळे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

चौकट
ठराव रखडल्याने विकासाला अडथळा
समित्यांच्या बैठका न झाल्यामुळे नगरसेवकांनी मांडलेले महत्त्वाचे ठराव प्रलंबित राहिले आहेत. यामुळे प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यांसारख्या कामांवर थेट परिणाम होत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांना फटका बसत असून, ही स्थिती कायम राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: 'होर्मुझ'मधील निर्बंध अखेर शिथिल होणार; इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Snakebite Antivenom: सर्पदंशावरील जीवनरक्षक लस निर्मितीसाठी डॉ. श्याम ढवण यांना उद्योगरत्न पुरस्कार

Junnar Crime : कुसुरमध्ये वडज धरण परिसरात शेती पंपाच्या केबल चोरीचा प्रयत्न फसला; तीन चोरटे नागरिकांच्या मदतीने पोलिसांच्या जाळ्यात

Porsche Car Accident : जामीनाच्या अटींचा भंग झाला असून साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता

खासदारांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे थेट मैदानात; विदर्भातून फुंकणार रणशिंग; आदित्य ठाकरे, संजय राऊतही सोबत...

SCROLL FOR NEXT