मुंबई

नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात भाजपची आघाडी

CD

नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात भाजपची आघाडी
कामे वेळेत, योग्यप्रकारे पूर्ण करण्याचे मंत्री लोढा यांचे निर्देश
मुंबई, ता. ८ : शहरातील नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. ही कामे वेळेत आणि योग्यप्रकारे पूर्ण करावीत, असे निर्देश कौशल्य विकास मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला शुक्रवारी (ता. ८) दिले. नालेसफाई दौऱ्यावरून महायुतीत काल नाराजीनाट्य घडले. त्यातच आज भाजपने नालेसफाईचे पाहणी दौरे करण्यात आघाडी घेतल्याचे दिसते.

पश्चिम उपनगरातील साऊथ अवेन्यू नाला, गझधरबंध नाला, एसएनडीटी नाला, गझधर पंपिंग स्टेशन, रसराज नाला, मिलेनियम क्लब नाला, जुहू पी. व्ही. आर. नाला, जुहू-वेसावे (वर्सोवा) जोड मार्ग नाला, वीरा देसाई मार्ग नाला, मोगरा नाला, शहीद भगतसिंग नगर नाला आदी नाल्यांची आज सहपालकमंत्री लोढा यांनी प्रत्यक्ष पाहणी करत नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतला. या वेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, सभागृहनेता गणेश खणकर तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे पालिका अधिकारी आणि भाजप नगरसेवक उपस्थित होते.

विविध नाल्यांमधून गाळ उपसा करण्याची कामे महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून सुरू आहेत. नाले स्वच्छतेच्या कामांची प्रगती विविध ठिकाणी भेट देऊन जाणून घेतली जात आहे. कामाची वास्तविक स्थिती जाणून घेण्यासाठी ही एकप्रकारची आकस्मिक भेट होती. येत्या ३१ मेपर्यंत ही नाले स्वच्छता पूर्ण करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
-अमित साटम, आमदार


--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयला ऐनवेळी धक्का! पाठिंब्याचं पत्र खोटं असल्याचा आरोप, आमदार बेपत्ता; TVKची तारेवरची कसरत, बहुमत जुळेना

Mumbai Bengaluru Vande Bharat : मुंबई-बंगळूर ‘वंदे भारत’ अखेर मिरजमार्गे धावणार, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती

LPG Cylinder Price: घरगुती गॅसपासून वाहनांच्या इंधनापर्यंत मोठी अपडेट; तुमच्या शहरात आजचा दर किती?

Pandharpur 10th Board Result: गवंड्याच्या मुलीचा दहावीच्या परिक्षेत डंका साक्षी वाघमारे 83 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम

नको बक्षिसे...नको मिरवणुका, आमच्या यशाची दखल तरी घ्या!; थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील ब्राँझपदक विजेत्या सात्त्विकराज रंकीरेड्डी याची खंत

SCROLL FOR NEXT